Ad will apear here
Next
ईएमव्ही चिपबेस एटीएम कार्ड घेण्याचे ‘महाबँके’चे आवाहन
पुणे : बँक ग्राहकांचे जुने मॅगस्ट्रीप आधारित एटीएम कम डेबिट कार्ड, नव्या ईएमव्ही चिप आधारित एटीएम कम डेबिट कार्डाने बदलून देण्याबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना सूचना दिल्या आहेत. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या परिपत्रकाप्रमाणे ३१ डिसेंबर २०१८पूर्वी जुनी मॅगस्ट्रीप आधारित एटीएम कार्ड नवे ईएमव्ही चिप आधारित एटीएम कम डेबिट कार्डाद्वारे बदलायचे आहे. नव्या ईएमव्ही चिप आधारित एटीएम कम डेबिट कार्डाच्या दर्शनी भागाच्या डाव्या बाजूस चिप बसवली गेलेली आहे.

३१ डिसेंबर २०१८नंतर सर्व जुनी मॅगस्ट्रीप आधारित एटीएम कम डेबिट कार्ड निष्क्रिय केली जाणार असल्याने त्याचा वापर ग्राहकांना करता येणार नाही.

रिझर्व्ह बँकेच्या आदेशाचे पालन करण्याच्या अनुषंगाने बँक ऑफ महाराष्ट्रने त्यांच्या सर्व ग्राहकांना त्यांचे जुने मॅगस्ट्रीप आधारित एटीएम कम डेबिट कार्ड बँकेत जमा करून त्या बदल्यात ईएमव्ही चिप आधारित एटीएम कम डेबिट कार्ड घेण्याचे आवाहन केले आहे. हे नवे कार्ड ग्राहकांना नि:शुल्क बदलून दिले जाईल. नवे चिप आधारित कार्ड घेण्यासाठी ग्राहक बँक ऑफ महाराष्ट्रच्या कोणत्याही सोईस्कर शाखेत जाऊन नवे कार्ड प्राप्त करू शकतात त्यामुळे ग्राहकांना त्यांचे खाते असणार्‍या शाखेतच जाण्याची आवश्यकता नाही.

नवे ईएमव्ही चिप आधारित एटीएम कम डेबिट कार्ड जुन्या मॅगस्ट्रीप आधारित एटीएम कम डेबिट कार्डाच्या बदल्यात घेण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रने त्यांच्या ग्राहकांना एसएमएसद्वारे तसेच एटीएममध्ये पोस्टर्सच्या प्रदर्शनाने आणि एटीएम स्क्रिन्सवरील संदेशाद्वारे कळविले आहे.    
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZJYBS
Similar Posts
एक जानेवारीपासून जुने एटीएम कार्ड वापरातून बंद होणार मुंबई : रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) जारी केलेल्या परिपत्रकानुसार जुनी मॅगस्ट्रीप आधारित एटीएम कार्ड ३१ डिसेंबर २०१८पासून बंद होणार असल्याने ग्राहकांना नवे ईएमव्ही चिप आधारित एटीएम कम डेबिट कार्ड बदलून द्यावेत, अशा सूचना ‘आरबीआय’ने बँकाना केल्या आहेत. त्यानुसार कार्डाच्या दर्शनी भागाच्या डाव्या बाजूस चिप
‘नजीकच्या काळात व्याजदराबाबत पुनरावलोकन करू’ मुंबई : ‘बाजारपेठेमधील रोखीच्या तरलतेची स्थिती स्थिर असून रिझर्व्ह बँकेद्वारा तीन खुल्या बाजारपेठेचा पर्याय (ओएमओ) उपलब्ध आहे. बहुतेक सर्वच बँकांनी त्यांच्या ठेवी आणि कर्जावरील व्याजदरामद्धे वाढ करण्यास सुरुवात केली असून बँक ऑफ महाराष्ट्र देखील नजीकच्या काळात व्याजदराबाबत पुनरावलोकन करेल,’ असे बँक ऑफ महाराष्ट्राचे कार्यकारी संचालक ए
‘महाबँके’कडून व्याजदराचे सुसूत्रीकरण पुणे : बँकेने विविध कालावधीतील कर्जाच्या व्याजदरामध्ये (एमसीएलआर) सुसूत्रीकरण करण्याच्या उद्देशाने व्याजदर बदलले आहेत. नवीन व्याजदर सात मे २०१८पासून लागू करण्यात येणार आहेत.
‘महाबँके’ची ‘माइंड सोल्यूशन्स’सोबत भागीदारी पुणे : ‘ए. टीआरईडीएस’ प्लॅटफॉर्मवर सहभागी होण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रने माइंड सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासोबत भागीदारी केली आहे. ‘ए. टीआरईडीएस’ हे लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योगांना (एमएसएमई) त्यांच्या लिलाव प्राप्त झालेल्या तंत्रज्ञानाद्वारे प्रतिस्पर्धात्मक दराने वित्तपुरवठा करण्यासाठी एक डिजिटल

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language